breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेतील उपअभियंता पाचशेच्या बंडलासह गायब

पुणे : महापालिकेच्या पथविभागात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.पुणे महापालिकेतील एका अभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.  हा संपूर्ण प्रकार मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आलेला आहे. आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे यांनी तो उघडकीस आणला.

हेही वाचा – ‘आनंदाचा शिधा’ सोबत महिलांना साडी देखील मिळणार! शिधामध्ये या गोष्टींचा समावेश असणार

रविकांत काळे हे एका कामासाठी महापालिकेत गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये संशयास्पद काहीतरी ठेवून गेल्याच त्यांच्या लक्षात आलं. त्यांचे ड्रॉवर उघडलं असता त्यात पाचशेच्या नोटांचा गठ्ठा आढळून आलं. विचारणा केली असता एक ठेकेदार ही रक्कम ठेवून गेला असल्याचं उपअभियंत्याने सांगितलं. तुम्ही हे पैसे का ठेवून घेतले याचा समाधानकारक उत्तर त्याला देता आलं नाही. त्यामुळे काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर रविकांत काळे हे याबाबत तक्रार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जात असतानाच संबंधित उपअभियंता रोख रकमेसह गायब झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button