ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेची कास अंगिकारून अतिउत्तम शिक्षण आत्मसात करावे: उद्योगपती डॉ. देवेंद्र बोरा

कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

पिंपरी: चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा गु्रप ऑफ इन्स्टिट्युटचे प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज्, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन उद्योगपती डॉ. देवेंद्र बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे व्यवसायिक डिंपक शहा, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांना माजी सैनिक रमेश वर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 120 हून अधिक विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करीत उत्कृष्ट बँड पथका समवेत पथ संचलन करीत उपस्थितांना मानवंदना दिली. त्यावेळी सगळा परिसर टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेला. यावेळी पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. देवेंद्र बोरा, डिंपल शहा यांच्या हस्ते गुणवंत प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समुह नृत्य, मल्लखांब, राष्ट्रीय एकात्मतावर आधारित अनेकता मे एकता चे सादरीकरण उपस्थितांसमोर पारंपारिक वेशभूषा परिधान करून केले.

प्रमुख पाहुणे उद्योगपती डॉ. देवेंद्र बोरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, तुम्ही जे शिकता ते अतिउत्तम शिक्षण आत्मसात करा. जीवनाचे सार्थक करा. स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कृतीला अनन्य साधारण महत्व आहे. यासाठी वेळेचे अचूक नियोजन करीत ध्येय निश्चितीच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्त्न करा, लक्षात ठेवा. आजचे जे कर्तव्य आहे त्याची अंमलबजावणी तत्काळ करा. जे-जे सर्वोत्तम व गुणवत्तापूर्ण आहे ते साध्य करण्याची विचारधारा स्वतःच आत्मसात करण्याचा दृढ निश्चय करा. तुमची देहबोली सजग ठेवत आजूबाजुला काय घडत आहे हे समजून घेवून स्वतःमध्ये कृतीरूपी बदल घडवून आणा.

उद्योजक डिंपल शहा म्हणाले, काही विद्यार्थी उत्तम शिक्षण घेवून परदेशी जात होते. आज भारत देश सर्वच क्षेत्रात उत्तुंग यश मिळवत आहे. देशाबाहेर गेलेले विविध क्षेत्रातील तरूण देखील परत मायदेशी येवून आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवित आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. दिपक शहा प्रास्ताविकात म्हणाले, आपण 26 जानेवारी साजरा करतो, परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांनी भारतीयांना संविधान दिले, त्याचे पालन आपण किती करतो याचा प्रत्येकाने विचार करावा. नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून भारतीय संस्कृती व परंपरेची जपणूक करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मेळ घालून अत्याधुनिक राष्ट्र निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय अतुलनीय आहे. त्यासाठी मानवजातीच्या व बौद्धिक विकासासाठी सर्वांचे सामुदायिक योगदान महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्रत्येकांनी ठेवावी असे आवाहन केले.

यावेळी संस्थेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली देशपांडे, डॉ. रविंद्र निरगुडे यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. सुनिता पटनाईक, प्रा. जस्मीन फराज यांनी तर, आभार उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे यांनी मानले. ध्यजारोहन ची व्यवस्था क्रिडा शिक्षक प्रा. शबाना शेख, डॉ. रविंद्र लुंकड, प्रा. पी.टी. इंगळे, प्रा. अक्षय परदेशी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button