TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये राम वाकडकर यांचे वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.वाढदिवसानिमित्त वाकड परिसरातील चार महिला बचत गटांचे उद्घाटन करण्यात आले. यात सुरभी बचत गट, सिद्धी बचत गट, जिजाऊ बचत गट, नारीशक्ती बचत गटाचे उद्घाटन करण्यात आले. राम वाकडकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

राम वाकडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळी तथा नगरसेवकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपाचे चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे, गणेश कस्पटे, नितीन इंगवले, अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे, सुदेश राक्षे, युवराज हुगे, विजय भुजबळ, विक्रम वाघमारे, कुणाल वाव्हळकर, रामदास कस्पटे, नीताताई कुशारे, भारतीताई विनोदी, अमर भूमकर, भरत अल्हाट, राजूशेठ करपे, मोहनदादा भूमकर, प्रकाश जमदाडे, मोहन विनोदे, विक्रम विनोदे, प्रमोद भुजबळ, सुरज भुजबळ, समीर भुजबळ, मयूर भुजबळ आदींनी शुभेच्छा दिल्या.

तसेच पिंपरी-चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तेजस्विनी ढोमसे व फेडरेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकार्यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button