ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युवा सेनेकडून जोरदार संघटन बांधणी; 100 हून अधिक पदाधिका-यांना नियुक्ती पत्र

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे संघटन बांधणीचे काम जोरदार सुरु असून युवा सेना मजबूत केली जात आहे. त्याच अनुषंगाने विविध युवकांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. 100 हून अधिक जणांना विभाग, शाखा, उपशाखा, कॉलेजकक्ष, आयटी सेल, समन्वयक अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वांना पिंपरी-चिंचवड युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या हस्ते आकुर्डीतील शिवसेना भवनात नियुक्ती पत्र देण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या उपशहर युवा अधिकरीपदी निखील येवले, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी नितीन पाटील, ओंकार विनोदे, अभिजीत पाटील, कॉलेजकक्ष अधिकारीपदी दिवेश गाजरे, शंतनू येवले, उपयुवा अधिकारीपदी प्रियेश माहुले यांची नियुक्ती करण्यात आली तसेच आयटीसेल अधिकारीपदी प्रशांत सिंग, अमर शिळमकर यांची नियुक्ती केली, तर पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

”पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे काम जोरदारपणे सुरु आहे. युवा सेनेच्या माध्यमातून संघटन मजबूत केले जात आहे. तरुणांचा शिवसेनेकडे कल वाढत आहेत. युवा सेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व तरुणांना आश्वासक, विश्वासार्ह वाटत आहे. त्यांच्याकडे पाहून शहरातील तरुण मोठ्या संख्येने युवासेना ‘जॉईन’ करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेचे काम करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडणून येण्यासाठी युवासैनिक काम करणार असल्याचे” युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button