breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

भारताच्या परकीय चलनात दमदार वाढ! रिझर्व्ह बँकेने दिली माहिती

मुंबई : भारताच्या परकीय चलन गंगाजळीत यंदा मोठी वाढ झाली असून, २८ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी ४.५३ अब्ज डॉलरने वाढून ५८८.७८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून ही माहीती पुढे आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २४ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात ५.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यासह आता परकीय चलनाचा साठा ५७८.७८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यापूर्वी १७ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात त्याच्या परकीय चलनाच्या साठ्यात १२.७८९ अब्ज डॉलरची वाढ झाली होती.

हेही वाचा – उद्धव ठाकरे की अजित पवार कोण होणार मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले..

परकीय गंगाजळीने ऑक्टोबर २०२१ मध्ये ६४५ अब्ज डॉलरची रेकॉर्डब्रेक पातळी गाठली होती. पण मुख्यत: जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेने परकीय गंगाजळी खुली केली होती, अशी माहीती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button