TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय ध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा’ चळवळ मजबूत करा: निलेश नेवाळे

  • चिखली परिसरात मोफत ध्वज वाटप उपक्रम
  • निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशनचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
‘श्री. निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चिखली, नेवाळे वस्ती, शरदनगर, कोयनानगर, घरकुल, सेक्टर २० येथील परिसरात मोफत ध्वज वाटप करण्यात आले. राष्ट्रीय ध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा’ चळवळ मजबूत करा, असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी केले.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘हर घर तिरंगा’ आवाहनास देशभरातून अतिशय चांगला व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी चिखली परिसरातील सर्व नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असे आवाहन निलेश दादा नेवाळे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यानिमित्ताने नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे. तसेच जनजागृती करण्यात येत आहे.यामध्ये, महिला बचत गट, संस्था, बँका, इमारती, सोसायटी, बैठी घरे, गणेश मंडळे, व्यावसायिक, दुकानदार, भाजीविक्रेते, फळविक्रेते, रिक्षा चालक, खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आदींना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे.

भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी व्हावी, यासाठी आम्ही देखील पुढाकार घेतला. राष्ट्रीय ध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा’ चळवळ मजबूत करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
– निलेश नेवाळे, सामाजिक कार्यकर्ते, चिखली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button