breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पडळकरांच्या वाहनावर सोलापुरात दगडफेक

सोलापूर |

भाजपचे विधान परिषद सदस्य तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर सोलापुरात समाजकंटकाने दगडफेक केली. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शहराच्या भवानी पेठ-मड्डी वस्ती भागात रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

आमदार पडळकर हे बुधवारी सोलापुरात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सायंकाळी भवानी पेठेत धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीसाठी ते जात असताना त्यांच्या मोटारीवर एका अज्ञात समाजकंटकाने दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मोटारीचे किरकोळ नुकसान झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button