breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

#SSRCase: अंमली विरोधी पथकाने जप्त केले तब्बल 45 फोन

मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना ड्रग्स घेत असल्याचा खुलासा झाला आहे. त्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर अंमली विरोधी पथकाने बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास सुरू केलेला आहे. आतापर्यंत दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी करण्यात आलेली आहे. अमली विरोधी पथकाने आतापर्यंत 45 फोन ताब्यात घेतलेले आहे. या फोनची तपासणी सध्या सुरू आहे.

या फोन्समुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांची मोठी यादी समोर येण्याची शक्यता आहे. 45 फोनपैकी 15 मोबाइल फोनची तपासणी पूर्ण झाली असून त्याचा रिपोर्ट हा NCB ला मिळालेला आहे. या आधारे आता NCB तपास करत आहे. उर्वरीत 30 मोबाइल फोनची तपासणी सुरू आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सारा अली खान, श्रद्धा, दीपिका, करिश्मा,जया शहा यांच्या मोबाइलचे रिपोर्ट हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button