breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: ईडीचा तपास थांबला

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तीन केंद्रीय संस्था करत असताना. अचानक ईडीच्या कार्यालयात एका अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास थांबवल्याचे कळते. या हत्येच्या तपासासाठी सीबीआयने एक विशेष पथक नेमले आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीला ईडी ने बुधवारी चौकशीसाठी बोलण्यात आले होते. या चौकशीपूर्वी एका अधिकाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्याचा कोरोनाला अहवाल पाँझिटिव्ह आला. त्यानंतर संबधितक अधिकाऱ्याला अलगीकरणात ठेवण्यात आले. तसेच कोरोना संक्रमण झालेल्या अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांनीही स्वतःला विलगीकरण केल्याने, या प्रकरणाचा तपास काही दिवसांसाठी थांबवणयात आल्याचे समजते. रियाच्या चौकशीत श्रुती मोदी आणि जया सहा या दोघांची नावे आल्यानंतर एनसीबीच्याही ते रडारवर आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button