breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

SSR Case | सीबीआयच्या चौकशीला सुरुवात…

मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सीबीआयने आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआयची 16 सदस्यांची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवली आहेत. याशिवाय सुशांतचा लॅपटॉप, मोबाईल आणि डायरीही सीबीआयने ताब्यात घेतली आहे.

दरम्यान रिया चक्रवर्ती ईडीनंतर आता सीबीआयच्या रडारवर आहे. ती या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सीबीआयची टीम कधीही रियाला समन्स बजावू शकते.

सीबीआयच्या विशेष तपास पथकाने वांद्र्याचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. प्रोटोकॉलनुसार सुशांत प्रकरणाच्या तपासाबाबत त्यांची बातचीत झाली. सीबीआयने या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंतची सर्व माहिती, फॉरेन्सिक पुरावे, शवविच्छेदन अहवाल, नोंदवलेले जबाब ताब्यात घेतले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button