breaking-newsताज्या घडामोडी

SSC EXAM: नांदेडमध्ये मराठीच्या पेपरला ७७३ विद्यार्थ्यांची दांडी

दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून नांदेडमध्ये मराठीच्या पेपरला ७७३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. जिल्ह्यातील १५७ परीक्षा केंद्रांवर पहिला पेपर घेण्यात आला़..पहिल्याच पेपर दिवशी ७७३ विद्यार्थ्यी गैरहजर असल्याचं समोर आलं आहे…

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानाचा फज्जा उडाला़ पन्नासहून अधिक कॉपीबहाद्दरांना भरारी पथकाने पकडले आहे़ मुखेडमध्ये तर व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती़ त्यामध्ये गुन्हेही नोंदविण्यात आले होते़ परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील काही सेंटरवर कॉप्यांचा सुळसुळाट होता़ त्यातच मंगळवारी दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली़ १५७ केंद्रांवर मंगळवारी मराठीचा पहिला पेपर घेण्यात आला़ ४७ हजार ६७ विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली होती.

परंतु पहिल्याच दिवशी ७७३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली असून ४६ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ …कॉपीमुक्तीसाठी परीक्षा केंद्रावर बैठे पथक आणि भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती़ तसेच परीक्षा केंद्र परिसरात फिरणाऱ्यांवरही पोलिसांमुळे वचक बसला होता़ दरम्यान, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी अतिरिक्त साहित्य घेवून येवू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे़ 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button