breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला मंजुरी

– महापालिका स्थायी समितीचा महत्वपूर्ण निर्णय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा उभारण्याच्या कामाला महापालिका स्थायी समितीच्या आज मंजुरी दिली.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संतोष लोंढे होते. मनपा प्रशासनाकडून हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सुरू झाले असून, जगद् विख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तब्बल १०० फूट उंच पुतळ्याचे काम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजीत केले आहे. मोशी येथील बोऱ्हाडेवाडी- विनायकनगर येथे पुतळ्याचे काम सुरू झाले आहे.
या कामासाठी मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम देण्यात आले आहे. कामाची निविदा रक्कम रक्कम ३२ कोटी ८४ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे. निविदा प्रक्रियेत रॉयल्टी व मटेरिअल टेस्टिंग चार्जेस वगळून निविदा दर मागविण्यात आला होता. त्यानुसार उपरोक्त ठेकेदाराकडून ०.५९ % कमी दराने म्हणजेच र. रु. ३२ कोटी ६५ लाख ३६ हजार ९९८ रुपये + रॉयल्टी चार्जेस र. रु. ०/- मटेरिअल टेस्टिंग चार्जेस र. रु. ०/- असा एकूण ३२ कोटी ६५ लाख ३६ हजार ९९८ रुपयांपर्यंत काम करुन घेण्यात येणार आहे. सुमारे ३ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या सदर कामाची मुदत १८ महिने आहे. या ऐतिहासिक पुतळ्याच्या कामासाठी सृष्टी डिझाईनर, पुणे या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, जगभरात प्रसिद्ध असलेले शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याचे काम करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button