breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup आधी भारतीय संघाला मोठा धक्का? ‘या’ खेळाडूची दुखापत गंभीर!

ODI World Cup 2023 : आयसीसीने भारतात होणाऱ्या विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा केली आहे. वर्ल्डकपच्या तयारीसाठी १०० दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिले आहे. दरम्यान, भारतीय संघाला विश्वचषकापुर्वी मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमी आहे.

श्रेयस अय्यर याला पाठदुखीमुळे सर्जरी करावी लागली होती. ऑगस्टमध्ये होणाऱ्या विश्वचषकापुर्वी तो तंदुरूस्त होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण अय्यर अद्याप त्यातून सावरलेला दिसत नाही. दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला आयपीएलला देखील मुकावे लागले होते. दरम्यान, अय्यरची दुखापतीतून संथ गतीने सावरत असल्याने बीसीसीआयच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा – मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! हल्लेखोरांकडून गोळाबार, दोघांचा मृत्यू

श्रेयस अय्यर आगामी विश्वचषकापूर्वी तंदुरूस्त होईल, अशी अपेक्षा आहे. पण अय्यर दुखापतीवर आताच बोलणं कठीण आहे. केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह वेगाने दुखापतीतून सावरत आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

भारतीय संघाचं संपुर्ण वेळापत्रक :

  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया : ८ ऑक्टोंबर २०२३, चेन्नई
  • भारत विरूद्ध अफगाणिस्तान : ११ ऑक्टोंबर २०२३, दिल्ली
  • भारत विरूद्ध पाकिस्तान : १५ ऑक्टोंबर २०२३, अहमदाबाद
  • भारत विरूद्ध बांग्लादेश : १९ ऑक्टोंबर २०२३, पुणे
  • भारत विरूद्ध न्यूझीलंड : २२ ऑक्टोंबर २०२३, धर्मशाला
  • भारत विरूद्ध इंग्लंड : २९ नोव्हेंबर २०२३, लखनौ
  • भारत विरूद्ध Qualifire २ : २ नोव्हेंबर २०२३, मुंबई
  • भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका : ५ नोव्हेंबर २०२३, कोलकाता
  • भारत विरूद्ध Qualifire १ : ११ नोव्हेंबर २०२३, बेंगलोर
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button