Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

फुटबॉल विश्वचषकात सर्वात जलद गोल आहे कोणाच्या नावावर…? जाणून घ्या ५ भन्नाट गोष्टी

FIFA World Cup 2026 : संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरणारा आणि कोट्यावधी क्रीडाप्रेमींचे डोळे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या ‘फिफा वर्ल्ड कप ‘चा महासंग्राम आजपासून मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांत रंगणार आहे. मैदानावर फुटबॉलचा थरार आणि प्रेक्षकांमध्ये विजयाचा ज्वर निर्माण करणाऱ्या या स्पर्धेवर अवध्या जगाचे लक्ष असणार आहे.’फिफा वर्ल्ड कप ‘च्या थराराला सुरुवात होत असताना फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील काही अविस्मरणीय विक्रमांची चर्चा रंगली आहे. त्यात सर्वात जलद गोलचा विक्रम विशेष मानला जातो. आता यामागील 5 भन्नाट गोष्टी जाणून घेऊया.

१९६६ च्या वर्ल्ड कपपूर्वी लंडनमध्ये प्रदर्शनातून ‘फिफा’ची मूळ ट्रॉफी (ज्युल्स रिमे ट्रॉफी) चोरीला गेली होती. संपूर्ण लंडन पोलिस हवालदिल झाले असताना, ‘पिकल्स’ नावाच्या एका पाळीव कुत्र्याने ही ट्रॉफी एका बागेतील झाडा‌झुडपातून शोधून काढली होती.

१९५० च्या ब्राझील वर्ल्ड कपसाठी भारतीय फुटबॉल संघ पात्र ठरला होता. मात्र, तत्कालीन नियमांनुसार ‘फिफा’ने खेळाडूंना अनवाणी (विना शूज) खेळण्यास नकार दिला. भारतीय खेळाडूंना बूट घालून खेळण्याची सवय नसल्यामुळे अखेर भारताने या स्पर्धेतून माघार घेतली होती.

हेही वाचा –  सकाळी उठल्या उठल्या फळे खाताय? ‘ही’ फळे रिकाम्या पोटी खाणे पडू शकते महाग!

वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोल करण्याचा विक्रम तुर्कीच्या ‘हकान शुकुर’ याच्या नावावर आहे. २००२ च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण कोरिवाविरुद्धच्या सामन्यात त्याने सामना सुरू झाल्यापासून अवघ्या ११ व्या सेकंदाला गोल डागला होता.

उरुग्वेमध्ये १९३० मध्ये झालेला पहिला वहिला फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघात ‘हेक्टर कॅस्ट्रो’ नावाचा खेळाडू होता. बालपणीच्या एका अपघातात त्याचा एक हात निकामी झाला होता, तरीही त्याने अंतिम सामन्यात गोल करून आपल्या देशाला विश्वविजेते बनवले होते.

२००६ च्या वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगाल विरुद्ध नेदरलैंड हा सामना फुटबॉल इतिहासातील सर्वांत हिंसका सामना ठरला, रशियन पंच व्हॅलेंटिन इव्हानोव्ह यांनी खेळाडूंना शांत करण्यासाठी तब्बल १६ पिवळी (Yellow) आणि ४ लाल (Red) कार्डे दाखवली होती. हा सामना ‘बॅटल ऑफ नुरेस्बर्ग म्हणून ओळखला जातो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button