युनिव्हर्सल बाॅस ‘ख्रिस गेल’ने समुद्रात मारल्या पुश-अप, व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/chriis-gayle-e1621390397157.png)
मालदीव – क्रिकेटच्या मैदानात स्टेडियमचे पत्रे फोडणारा ‘युनिव्हर्सल बाॅस’ ख्रिस गेल यंदा आयपीएल रद्द झाल्यानं मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं आयपीएल रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर डेव्हिड वाॅर्नर, स्टीवन स्मिथ आणि वेस्ट इंडिजचे काही खेळाडू मालदीवमध्ये राहायला गेले. त्यानंतर आता ख्रिस गेलचा मस्ती करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कॅरिबियन क्रिकेटपटू ख्रिस गेलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘स्कूबा डायव्हिंग इन द मालदीव’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. त्या व्हिडीओमध्ये तो हिंदी महासागरात उडी टाकताना दिसत आहे. त्यात त्यानं युनिव्हर्सल बाॅस असं झळकतं टायटल टाकलं आहे. तर तो समुद्रातील माश्यांसोबत मस्ती देखील करत आहे. त्यात त्याने 11 पुश-अप मारले.
recommended by
Mgid
Mgid
यदि आप इस तरह से पेपिलोमा पाते हैं, तो सावधान रहें!
तुरंत पता लगाओ!
व्हिडीओमध्ये ख्रिस गेल ‘ओ मामा आणि कोको लोको रिमिक्स’ या त्यांच्या आवडत्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. कॅरिबियन खेळाडूंचा डान्स आयपीएलमध्ये प्रसिद्ध आहे. ख्रिस गेलनं देखील त्याच्या अंदाजातील डान्स त्यानं करून दाखवला आहे. तर त्याचबरोबर शेवटी त्यानं पंजाब किंग्जचा कर्णधार के एल राहूलने शिकवलेला नमस्कार देखील करून दाखवला.
दरम्यान, आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं यंदाची आयपीएल रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्यानंतर परदेशी खेळाडू अडचणीत सापडले होते. कोरोनामुळे त्यांना त्याच्या स्वदेशी जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर काही ऑस्ट्रेलियन आणि कॅरेबियन खेळाडूंनी मालदीवमध्ये मुक्काम ठोकला होता.
https://www.instagram.com/p/CPAInZ3hreg/?utm_source=ig_embed&ig_rid=5a66bda7-65d5-42f5-9f68-f12df91ad292&ig_mid=8A4C2A88-7B9B-4ABA-907E-60F8BF5AD78E