breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs PAK : भारत-पाकिस्तान संघात आज रंगणार विश्वचषकातील सर्वात मोठा सामना

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या तिसरी फेरी सुरू झाली असून या फेरीत आज म्हणजेच १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध एकही सामना हरलेला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरही हा विक्रम कायम ठेवायचा आहे.

भारताचा सामना पाकिस्तानविरूद्ध रंगणार असून भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत संघातील अनुभवी फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांची कामगिरीही या स्पर्धेत आतापर्यंत दमदार राहिली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना २०१९ साली झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ८९ रन्सने पराभव केला होता.

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेची आज विराट सभा, सभेसाठी यंत्रणा सज्ज

सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. प्रत्येकाला रोमांचक सामना पाहायचा आहे, परंतु पावसाने आशा धुळीस मिळवू शकतो. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) अहमदाबाद शहर आणि उत्तर गुजरातमध्ये सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

भारताचा संभाव्य संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

पाकिस्तानचा संभाव्य संघ :

इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान , सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button