breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेची आज विराट सभा, सभेसाठी यंत्रणा सज्ज

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. जे सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. मात्र त्यांचं आंदोलन सुरुच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरा केला. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी या ठिकाणी सभा होणार आहे.

अंतरवली सराटीत जनप्रलयच आला आहे. मराठा समाज शांततेत आला आहे आणि शांतेत जाईल. आज दुपारी १२ वाजता सभेला सुरुवात होईल. ११०० एकरवर पार्किंगची सोय केलीय. १७० एकर जागेवर सभा होत आहे.

हेही वाचा – ‘७२ तासांत शिंदे-फडणवीस सरकार पडणार’; संजय राऊत यांचा मोठा दावा

या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये ११० रुग्णवाहिका, त्यात ३५ कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच ४० बेडस, ३०० डॉक्टर, ३०० नर्सिंग स्टाफ असेल. १२,००० लिटरचे ५० पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. ५ लाख पाणी बॉटल्स, १००० लाऊड स्पीकर, २० LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button