शालेय जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील खेळाडुंची बाजी!
अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाउंडेशनचा पुढाकार : विविध गटांमध्ये 250 नेमबाज खेळाडुंचा सहभाग
पिंपरी : अरुण पाडुळे स्पोर्ट्स फॉउंडेशन च्या वतीने यावर्षी शालेय जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा व पुणे जिल्हास्तरीय प्यारा नेमबाजी स्पर्धेच यशस्वी आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पद्मश्री पुरस्कार सन्मानित गिरीशजी प्रभुणे सर, ऑलिम्पिक नेमबाजी संघातील स्वरूप उन्हाळकर सर, अरुण सर पाडुळे (राष्ट्रीय खेळाडू नेमबाजी) क्रीडा आयुक्त पंकज पाटील सर, केदारी मॅडम क्रीडा अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
कृष्णा नगर स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथे अरुण पाडुळे स्पोर्ट फाउंडेशन तर्फे अद्यावत असे नेमबाजी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून पहिल्यांदा येथे शालेय जिल्हा स्तरीय स्पर्धा भवरण्यात आल्या.. या स्पर्धेत संपूर्ण पिपंरी चिंचवड शहरातील शाळेतील मुलांनी व मुलींनी अनुक्रमे 14,17,19 अशा वेगवेगळ्या गटात सुमारे 250 नेमबाज खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
वयोगट 17 पीप साईट रायफल शंतनू शेखर लांडगे,आराध्या भागवत,अश्विन देवळेकर, वयोगट 19 एअर पिस्तूल, राजनंदिनी जितू यादव , प्रमिला कांबळे. वयोगट 14 मुली पीप साईट रायफल आरोही रॉय,गोजिरी घाडगे,जोया शेख. वयोगट 14 एअर पिस्तूल कल्याणी तरस, सांची नेवाळे,त्रिशा हजरनिस.वयोगट 19 एअर पिस्तूल आर्यन घोडनदिकर, यशराज जवळकर, प्रणव सूर्यवंशी,वयोगट 17 एअर पिस्तूल आर्या म्हस्के, रितिका आहेर,इशिता कुंभार या विजेत्या खेळाडूनी यात यश संपादन करून विभागीय स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे.
तसेच, पिपंरी चिंचवड महानगरपालिका व प्यारा (दिव्यांग) टार्गेट असोसिएशन पुणे व अरुण पाडुळे स्पोर्ट्स फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 ली पुणे जिल्हास्तरीय प्यारा नेमबाजी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे शहरातील 100 हुन अधिक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता,या स्पर्धेचा प्रमुख उद्देश दिव्यांग नेमबाज खेळाडूंना प्रोत्साहन देऊन नेमबाजी खेळामध्ये देश पातळीवर व अंतराष्ट्रीय पातळीवर नेमबाजी मध्ये देशाचं नाव नेमबाजी क्षेत्रा घेऊन जातील हा होता.. असे नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख राष्ट्रीय खेळाडू अरुण सर पाडुळे यांनी सांगितले.
यावेळी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री गिरीशजी प्रभुणे सर यांनी सर्व दिव्यांग खेळाडूंचे नेमबाजी खेळात सहभाग नोंदवला त्यासाठी कौतुक केले व एवढ्या संघर्षमय जीवनातून खेळामधून देशाचं नाव अंतराष्ट्रीय पातळीवर कस नेता येईल यासाठी खेळाडूंना स्पर्धे साठी ठिकाण उपलब्ध करून दिल्याबद्दल पिं. चिं मनपा व अरुण पाडुळे स्पोर्ट्स फॉउंडेशन चे आभार सुद्धा मानले.




