Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य; म्हणाला..

Ricky Ponting and Gautam Gambhir | रिकी पॉन्टिंगने न्यूझीलंडविरूद्धच्या भारताच्या कसोटी पराभवानंतर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली होती. यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषेत रिकी पॉन्टिंगला चांगलंच सुनावलं होतं. यानंतर आता रिकी पॉन्टिंगने गंभीरच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे.

रिकी पॉन्टिंग म्हणाला की, मी नुकतीच विराटची आकडेवारी पाहिली, त्यात असे दिसले आहे की गेल्या पाच वर्षांत त्याने फक्त दोन ते तीन कसोटी शतके झळकावली आहेत. ते मला योग्य वाटलं नाही. पण जर ते खरे असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षांत केवळ दोन कसोटी सामन्यात शतकं झळकावणारा टॉप ऑर्डरमधील फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा कदाचित दुसरा कोणी नसेल.

हेही वाचा     –      ‘मी ४१५८ कोटींचा विकास निधी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या’; सुनिल शेळके यांचं विरोधकांना खुले आव्हान 

रिकी पॉन्टिंगच्या या विधानावर गौतम गंभीर म्हणाला, की पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याला विराट आणि रोहितची चिंता नसावी. ते दोघेही एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही साध्य केलं आहे आणि भविष्यातही ते कायम साध्य करत राहतील. मला वाटतं, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अजूनही खूप कठोर परिश्रम करतात.

गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेवर पॉन्टिंग म्हणाला की, प्रतिक्रिया वाचून मला आश्चर्य वाटले, परंतु प्रशिक्षक गौतम गंभीरला मी ओळखतो. तो खूप चिडखोर स्वभावाचा आहे, म्हणून तो जे काही बोलला त्याचे मला आश्चर्य वाटले नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button