breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

पृथ्वी शॉने केलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावरून दिली माहिती

Prithvi Shaw : भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या चर्चेत आहे. पृथ्वीने आपल्या इस्टाग्रामवर एक एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये त्याने गर्लफ्रेंडचा फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली होती. परंतु काही वेळाने त्याने ही इन्स्टा स्टोरी डिलीट केली. त्यामुळे आता पृथ्वीने लग्न केल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

पृथ्वीने गर्लफ्रेंड निधी तापडिया हिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याने ‘हॅप्पी व्हॅलेंन्टाईन्स डे माय वायफी’ असं म्हटलं होतं. मात्र त्याला नंतर लक्षात आल्यानंतर ती स्टोरी डिलेट करण्यात आली.

कोण आहे निधी तापडिया?

निधी तापडिया ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अलिकडेच निधीसोबत फिरतानाचे पृथ्वीचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिने CID या प्रसिद्ध मालिकेतही काम केलं आहे. २०१९ मध्ये जट्टा कोका या पंजाबी गाण्याच्या व्हिडीओत झळकली होती. हा व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button