नागपूरची सोनाली पांडेची ऑस्ट्रेलियन कर्णबधिर क्रिकेट संघासाठी डॉक्टर म्हणून नियुक्ती
ऑर्थोपेडिक सर्जन सोनाली पांडे ऑस्ट्रेलियन संघासोबत क्रीडा आणि व्यायाम म्हणून काम

नागपूर : नागपूरची कन्या सोनाली पांडेची ऑस्ट्रेलियन कर्णबधिर क्रिकेट संघासाठी टीम डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑर्थोपेडिक सर्जन सोनाली पांडे ऑस्ट्रेलियन संघासोबत क्रीडा आणि व्यायाम औषध डॉक्टर म्हणून काम करणार आहे. ती सध्या तिरंगी वन-डे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली आहे आणि तीने भारतीय मूकबधिर क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सोमलवार शाळा आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीने आपले शिक्षण पूर्ण केले. सोनालीने तिच्या क्षेत्रात तिहेरी पदव्युत्तर पदवी मिळवून एक प्रभावी शैक्षणिक विक्रम नोंदवला आहे.ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमॅटोलॉजी क्षेत्रात सोनालीला २५ वर्षांच्या अनुभव आहे. ती मागच्या १५ वर्षांपासून ब्रुनेईमध्ये सल्लागार ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत आहे.
हेही वाचा : ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
TOI सोबत बोलताना कर्णबधिर क्रिकेट संघाचे वैद्यकीय टीम म्हणून काम करणे तीने आव्हानात्मक असल्याचे सांगितले. “जवळजवळ सर्व खेळाडू त्यांच्या दैनंदिन जीवनात कॉक्लियर इम्प्लांट किंवा श्रवणयंत्र वापरतात. पण खेळताना त्यांना ते काढून ठेवावे लागते, ज्यामुळे टक्कर दुखापतीचा धोका वाढतो. इथेच ऑर्थोपेडिक तज्ञ निर्णायक ठरतात.” तीने सांगितले.
ऑस्ट्रेलियन कर्णबधिर संघ दिल्लीतील कर्नाल क्रिकेट स्टेडियमवर तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध खेळणार आहे. “सुदैवाने, सध्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता चांगली आहे, ज्यामुळे खेळाडूंसाठी गोष्टी सुलभ होत आहेत,” ती पुढे म्हणाली.