Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडा

मुंबई विरूद्ध चेन्नई हाय व्होल्टेज सामना; रोहित-धोनी आज खेळणार का?

MI vs CSK | आयपीएल २०२६ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किग्स यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवला जाणार असून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक मानला जात आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत केवळ २-२ सामने जिंकले असल्याने गुणतालिकेत वर जाण्यासाठी विजय अत्यावश्यक ठरणार आहे.

रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मागील काही सामने खेळू शकला नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची माहिती समोर येत असून या सामन्यात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. रोहित संघात परतल्यास मुंबईची फलंदाजी अधिक मजबूत होणार असून घरच्या मैदानाचा फायदा संघाला मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा 

महाराष्ट्रात २.५६ लाख कोटींची गुंतवणूक, १ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, एम.एस. धोनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला अद्याप एकही सामना खेळता आला नव्हता. मात्र वानखेडे स्टेडियमवर सराव करताना तो दिसून आल्याने या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता वाढली आहे. धोनी संघात परतल्यास कर्णधार ऋतुराज गायकवाड याला निर्णय घेण्यात मदत होईल आणि संघाचा आत्मविश्वासही वाढेल, असे मानले जात आहे.

चेन्नईला धक्का; आयुष म्हात्रे स्पर्धेबाहेर

चेन्नई सुपर किंग्जला आधीच मोठा धक्का बसला असून फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाच्या फलंदाजीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नाणेफेक ठरू शकते निर्णायक

वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीचा विचार करता नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. घरच्या मैदानाचा फायदा आणि प्रमुख खेळाडूंचे संभाव्य पुनरागमन यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button