Breaking-newsपिंपरी / चिंचवड

फुटबॉल स्पर्धेत एस.एफ.एक्स संघाला विजेतेपद

  • युथ फाॅर क्राइस्ट फाउंडेशनतर्फे फुटबाॅल स्पर्धेचे आयोजन

चिंचवड – यूथ फॉर क्राइस्ट फाऊंडेशनच्या वतीने आंतर चर्च फुटबॉल स्पर्धेत चिंचवडच्या एस.एफ. एक्स फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पिंपरीच्या चर्च ऑफ गॉड संघाचा 1-0 असा पराभव केला.

चिंचवडमधील सॉकर यार्ड,काकडे पार्क येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस. एफ. एक्स फुटबॉल संघाने चर्च ऑफ गॉड संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास ८ हजार ८८८ रुपये रोख व करंडक तर उपविजेत्या संघास ५ हजार ५५५ रुपये रोख व करंडक प्रदान करण्यात आला. ‘सेव्हन अ साईड’ असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघात एक महिला खेळाडू अनिवार्य असल्याने तरुणींचा सहभाग लक्षणीय होता.

ह्या स्पर्धेसाठी प्रमुख म्हणून स्लम सॉकरचे फाउंडर विजय बारसे सर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिडा विभागाचे सभापती तुषार हिंगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, उद्योजक विश्वास दळवी व राजेंद्र जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, माजी एन एस यू आय अध्यक्ष विशाल कसबे, वसंत गजभीव, जॉन गजभीव, प्रशांत केदारी, शीतल पवार, जॉयसी जोसेफ, धर्मगुरू डोंगरदिवे, रेजि थॉमस, डॅनियल अँथनी, फिलोमन म्हात्रे, सुधीर अवचिते, कोशी चेरीयन, येशूदास सायना आदी उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदेश बोर्डे, स्नेहल डोंगरदीवे, प्रशांत बनकर, डॅनियल दळवी, स्नेहल गायकवाड, विशाल दौंडे, बिनू चेरीयन, कुशल सोज्वळ, फ्रँक पीटर, संदीप गायकवाड, संतोष साळवे, अमोल कर्डक, कुणाल साखरपेकर, आशिष गालफाडे, गौरव खटाने, हनोक पुजार, रोहित पाटोळे स्टीफन बोर्डे, संदीप पारवे, अजय उत्तेकर यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button