क्रिडाताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला मंत्रांच्या हस्ते धनादेश, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला व पुरुष संघाने सुवर्णपदक पटकाविले

नागपूर : बुडापेस्ट (हंगेरी) येथे १० ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला व पुरुष संघाने सुवर्णपदक पटकाविले होते. भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणारी नागपूर येथील आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघात प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख व पुरुष संघात विदीत गुजराथीचा समावेश होता.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते दिव्या देशमुख एक कोटी रुपयाचा धनादेश व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. विदीत गुजराथी स्पर्धेसाठी विदेशात असल्यामुळे त्याच्यातर्फे विदीतचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी सन्मान स्वीकारला.

भारतीय संघाचे मार्गदर्शक नागपूर येथील संकल्प गुप्ता व पुणे येथील अभिजित कुंटे यांना १० लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. ऑलिम्पियाडमध्ये पुरुष गटात १९३ आणि महिला गटात १८१ देशांचे संघ सहभागी झाले होते.

वैयक्तिक गटात उत्कृष्ट कामगिरी

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी भारताच्या पुरुष व महिला संघाने सुवर्णपदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे भारतीय महिला संघाच्या यशात नागपूरच्या दिव्या देशमुखचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तिने केवळ सांघिक गटातच पदक मिळविले नाही, तर वैयक्तिक गटातही सुवर्णावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे दिव्या देशमुखने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ११ पैकी एकही फेरीमध्ये पराभवाचा सामना केला नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button