breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
#INDvsAUS20-20:ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात, भारताचा 2-1 असा मालिका विजय
![# INDvsAUS20-20: Australia beat India by 12 runs, India win the series 2-1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/aus-win-thard-20-20.jpg)
सिडनी – सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 धावांनी पराभव केला. याचसोबत तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेऊन मालिका विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 187 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकात 174 धावाच करु शकला.