Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारताचा ऑस्ट्रोलियावर दमदार विजय; भारताची मालिकेत १-० ने आघाडी

ऑस्ट्रोलियाचा संघ ९१ धावांवर ऑल आऊट

IND vs AUS : भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर टॉफीतील पहिला सामना नागपुरमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर १३२ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली होती. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ ९१ धावांवर आटोपला. भारताने हा सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ६३.५ षटकांत १७७ धावांचे आव्हान भारताला दिले. प्रत्युत्तरात भारताने २२३ धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलिया संघाला ४०० धावाची आघाडी घेतली. परंतु ऑस्ट्रेलिया संघ ३२.२ षटकांत ९१ धावांवर आटोपला. भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ८ बळी घेत ऑस्ट्रेलिया संघाला खिंडार पाडले. तर जडेजाने ७ बळी घेतले आहेत.

दरम्यान, भारतीय फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने १२० धावांची दमदार खेळी केली. त्या शिवाय रवींद्र जडेजाने ७० तर अक्षर पटेलने ८४ धावांची खेळी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button