भारतीय दिग्गज क्रिकेटर हरभजन आणि युवराज ED च्या कचाट्यात
प्रतिबंध घालण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मची चौकशी

मुंबई : क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हरभजन आणि युवराज सिंग हे अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. सुरेश रैना आणि उर्वशी रौतेला सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हरभजन, युवराज, सुरेश रैना, उर्वशी रौतेला यांनी केलेल्या जाहिराती आता तपासाच्या कक्षेत आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ED 1xBet सारख्या प्रतिबंध घालण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मची चौकशी करत आहे. या प्रकरणात ED ने अनेक दिग्गजांची चौकशी करत आहे. ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, सेरोगेट नावाच्या ॲपचा वापर करण्यात येत होता. ते वेब लिंक, QR कोडचा वापर करत होते. तपासानुसार, अनेक जण रिडायरेक्ट सेरोगेट नावाच्या ॲपचा वापर करत.
हेही वाचा : सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नकोच; शरद पवार
भारतीय कायद्याचे उल्लंघन
ED च्या तपासानुसार, प्रतिबंध घालण्यात आलेले प्लॅटफॉर्म स्वतःला गेम होस्ट करत असल्याचे दाखवत होते. पण ते त्या अल्गोरिदमचा वापर कर होते, जे सध्याच्या भारतीय कायद्यातंर्गत जुगार हा गुन्हा ठरतो. तपास यंत्रणेनुसार, बेकायदेशीर सट्टेबाजी ॲपचा वापर करण्यासाठी आयटी अधिनियम, परदेशी चलन राखीव व्यवस्थापन कायदा, कठोर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा यांचे उल्लंघन झाले आहे.
लाखो लोकांना टाकले संकटात
याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार बेकायदेशीर सट्टेबाजी ॲपमध्ये लाखो रुपये लागले आहेत. हे सट्टेबाजी ॲपचा अनेक कुटुंबांना गंडा बसला आहे. मध्यमवर्ग आणि निम्न मध्यम वर्गावर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बेकायदेशीर सट्टेबाजी ॲपप्रकरणात अडकलेला अभिनेता राणा दुग्गबाती याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ऑनलाईन गेमला सर्वोच्च न्यायालयाने जुगाराच्या तुलनेत वेगळे मानले आहे. कारण हा खेळ कौशल्यावर आधारीत आहे.
माध्यमांशी बोलण्यास नकार
या प्रकरणात माजी क्रिकेटर सुरेश रैना, हरभजन सिंह, युवराज सिंह, अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद यांनी याविषयावर प्रसार माध्यमांशी बोलण्यास सपशेल नकार दिला. ईडीने म्हटले आहे की, जाहिराती चालवण्यासाठी अनेक माध्यमांना मोठी रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम 50 कोटींच्या घरात आहे.