Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

भारताची विजयी सलामी ! अमेरिकेवर 29 धावांनी केली मात

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झाली असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने झळकावलेले दमदार अर्धशतक आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या सुरेख माऱ्याच्या बळावर भारताने अमेरिकेला २९ धावांनी नमवित विजयी सलामी दिली.

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले होते, मात्र सूर्यकुमारच्या झंझावाती ८४ धावांच्या जोरावर भारताने अमेरिकेसमोर १६१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चिवट गोलंदाजीच्या बळावर अमेरिकेचा डाव ८ बाद १३२ धावांवर रोखला.

अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. दुसऱ्याच षटकात अली खानने सलामीवीर अभिषेक शर्माला शून्यावर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण सहावे षटक भारतासाठी अनापेक्षित ठरले.

शेंडली वॅन शाल्क्विकने या एकाच षटकात इशान (२०), तिलक (२५) आणि शिवम दुबे (०) यांना तंबूचा रस्ता दाखवत भारतीय डावाचे कंबरडे मोडले. एका टप्प्यावर भारताची अवस्था ४ बाद ४६ अशी नाजूक झाली होती.

हेही वाचा – ‘आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मधल्या फळीत रिंकू सिंग (६) आणि हार्दिक पांड्या (५) स्वस्तात बाद झाल्याने वानखेडेवर शांतता पसरली होती. मात्र, एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने अक्षर पटेलसोबत महत्त्वपूर्ण ४१ धावांची भागीदारी करत संघाला शंभरचा टप्पा ओलांडून दिला.

शेवटच्या षटकांमध्ये सूर्याने आक्रमक खेळ केला. त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८४ धावांची खेळी साकारली. विशेषतः २० व्या षटकात त्याने २१ धावा कुटल्या, ज्यामुळे भारताला ९ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारता आली.

१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अँड्रिज गॉस, साईतेजा मुक्कामल्ला आणि कर्णधार मोनांक पटेल झटपट बाद झाले आणि अमेरिकेच्या संघाची अवस्था ३.२ षटकांत ३ बाद १३ अशी बिकट झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी टिचून मारा करत अमेरिकेच्या संघाला चांगलेच धारेवर धरले.

आपल्या पहिल्या तीन षटकांत सिराजने १८ तर अर्शदीपने अवघ्या ११ धावा खर्च केल्या. मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती यांनी ४ थ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत अमेरिकेचा डाव सावरला, मात्र अपेक्षित धावगती राखण्यात त्यांना अपयश आले. वरुण चक्रवर्तीने मिलिंद कुमारला ३४ धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली.

त्यानंतर अक्षर पटेलने संजय कृष्णमूर्ती आणि हरमीत सिंगला लागोपाठच्या चेंडूवर बाद करत अमेरिकेच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. शेवटच्या ४ षटकांत अमेरिकेच्या संघाला ६१ धावांची आवश्यकता होती, तेव्हा शुभम रंजने (३१) याने काही एकाकी झुंज दिली; मात्र अमेरिकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३२ धावांपर्यंतच मर्यादित राहिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button