Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघाचे न्यूझीलंडसमोर लोटांगण, अवघ्‍या ४६ धावांवर पहिला डाव संपुष्‍टात

IND vs NZ | भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामन्याला कालपासून खेळवण्यात येणार होता परुंतु पावसामुळे हा नाणेफेकही झाली नाही. आज दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजा करण्याचा निर्णय काही चांगला ठरताना दिसला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला ३६ धावांत ६ धक्के बसले.

प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्वत: २ धावा करुन बाद झाला तर यशस्वी जयस्वाल १३ धावा करुन बाद झाला. न्यूजीलंडच्या गोलंदाजाच्या भेदक मारासमोर टीम इंडिया मैदानावर जास्त टिकू शकली नाही. पाच फलंदाज तर खाते न उघडताच प्वहेलियनकडे चालते झाले. विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा हे पाचही फलंदाज शून्यावर बाद झाले. भारताकडून फलंदाजीत सर्वाधिक धावा या ऋषभ पंतने २० केल्या.

हेही वाचा    –    ‘हॉलो, लॉरेन्स भाई..’; सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोईला खास मेसेज 

४६ धावा ही टीम इंडियाची मायदेशातील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी १९७९ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ७५ धावांत गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. २०२० मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांत गारद झाली होती आणि आता ही टीम स्वतःच्या घरी ५० धावांपर्यंत पोहोचू शकली नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button