भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा..

IND vs ENG Semi Final 2024 | भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुपर-८ च्या गट-१ मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना २७ जून रोजी इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता असल्याने पावसामुळे सामना जर रद्द झाला तर कोणता संघ अंतिम फेरीत जाणार जाणून घ्या..
दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीने कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. पण पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाऊस पडल्यास राखीव दिवसाऐवजी त्या सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी खेळवता येईल. असे न झाल्यास गट टप्प्यात अव्वल स्थानी असलेल्या संघाला फायदा होईल आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजे फक्त भारतालाच फायदा होईल.
हेही वाचा – ‘मोदींना राहुल गांधींना राम-राम करावा लागेल’; संजय राऊतांचं विधान
भारतीय संघाने सुपर-८ च्या गट-१ मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. तर ग्रुप-२ मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ बाहेर पडेल.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हरितालिका आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ :
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली आणि मार्क वूड.





