breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

ICC कडून क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी, ‘या’ तारखेपासून मिळणार तिकेटे

World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्ड कपसाठी काही दिवस बाकी आहेत. यंदा वर्ल्डकप भारतात होणार आहे. त्यामुळे भारताला प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

भारत पाकिस्तान हा सामना १५ ऑक्टोंबर ऐवजी १४ ऑक्टोंबरला होणार आहे. या सामन्यांची तिकीटांबाबतची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. २५ ऑगस्टपासून चाहत्यांना भारतीय संघ सोडून इतर सर्व सामन्यांची तिकिटे उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा – ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केली पोस्ट

गुवाहाटी आणि त्रिवेंद्र इथे होणाऱ्या सामन्यांची तिकिटे ३० ऑगस्टपासून बुक करता येणार आहेत. ३१ ऑगस्टपासून चेन्नई, दिल्ली आणि पुण्यामध्ये होणऱ्या सामन्यांची तिकिटे बुक करता येणार आहेत. तर २ सप्टेंबरपासून बेंगळुरू आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांचे बुकिंग चाहत्यांना करता येईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकिटे ३ सप्टेंबरपासून बुक करता येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button