म्हाडाच्या घराचा ताबा लवकरात लवकर मिळावा
अन्यथा कठोर कठोर कारवाई करण्याचा लाभार्थ्यांचा इशारा
लाभार्थीधारक कमिटी मेंबर्सचे पुणे म्हाडा कार्यकारी अधिकाऱ्यांना निवदेन
पुणेः तळेगाव दाभाडे येथील म्हाडाच्या घराचा ताबा लवकरात लवकर मिळावा, या मागणीसाठी म्हाडा कार्यालय पुणे येथील मुख्याधिकाऱ्यांना म्हाडा घरांच्या लाभार्थीधारक कमेटी मेंबर्सच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दोन दिवसांत म्हाडाकडून दखल घेतली गेली नाही तर कठर कारवाई करण्याचा इशारा लाभार्थीधारक कमेटी मेंबर्सद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला आमच्या घराचा ताबा लवकरात लवकर मिळावा, आम्ही दोन वर्ष फक्त ताबा मिळेल, या आशेवरच आहोत. ताबा मिळणेसंदर्भात आपल्याकडून तसा कोणताच प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. फक्त आम्हाला आश्वासन देतात की, तुम्हाला लवकरच ताबा देऊ, परंत तसे काही निश्चित आम्हाला वाटत नाही. जानेवारीपर्यंत ताबा देऊ असे सांगण्यात येते होते. मात्र, कामाची प्रगती पाहता जुलैला ताबा मिळेल, असे वाटत होते, मात्र आता सप्टेंबर महिना सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप आमचे अॅग्रीमेंट व कोणतीही दखल म्हाडा ऑफिसकडून घेतली गेली नाही.
सदर अर्जाचा विचार करून एक ते दोन दिवसात निर्णय कळविण्याची विनंती करण्यात आली आहे. अन्यथा लाभार्थीधारक कठोर पाऊले उचलू, असा इशारा लाभार्थी धारक कमेटी मेंबरसद्वारे म्हाडा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.





