breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

हार्दिक पंड्याची घरवापसी! मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला १५ कोटी देणार?

Hardik Pandya : आयपीएलच्या २०२४ हंगामासाठी १९ डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे. पण त्याआधी २६ नोव्हेंबरला ट्रान्सफर विंडोचा अवधी संपत आहे. ट्रान्सफर विंडोअंतर्गत संघांना परस्पर सामंजस्याने खेळाडूंची अदलाबदल करता येते. दरम्यान, गुजरात टायटन्स संघाला आयपीएल स्पर्धेचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडे परतणार असल्याची चर्चा आहे.

२०२२ मध्ये मोठ्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरेन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. हार्दिकला रिटेन न ठेवल्याने मुंबई इंडियन्सच्या धोरणांवर टीकाही झाली होती. हार्दिकला आयपीएलमधील नवा संघ गुजरात टायटन्सने हेरलं. हार्दिक पंड्याचं नेतृत्व आणि आशिष नेहरा यांचं मार्गदर्शन या जोडगोळीने पहिल्याच हंगामात संघाला जेतेपद मिळवून दिलं. या यशातूनच हार्दिकला भारताच्या ट्वेन्टी२० संघाची कमान मिळाली होती.

हेही वाचा  – आमचे लोक अटक करण्यामागे सरकारचा कोणता डाव? मनोज जरांगे पाटीलांचा सवाल 

क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स तब्बल १५ कोटी रुपये खर्चून हार्दिकला ताफ्यात घेणार असल्याचं वृत्त आहे. सगळं जुळून आलं तर आयपीएल स्पर्धेतला हा सगळ्यात मोठा ट्रेडऑफ ठरेल.

दरम्यान, ट्रेडऑफ्समध्ये लखनौ सुपरजायंट्सने रोमारिओ शेफर्डला रिलीज केलं आहे. अष्टपैलू शेफर्ड आता मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसेल. देवदत्त पड्डीकल आता राजस्थान रॉयल्सऐवजी लखनौ सुपरजायंट्स संघासाठी खेळताना दिसेल. या बदल्यात राजस्थानने वेगवान गोलंदाज अवेश खानला संघात समाविष्ट केलं आहे. जिगरबाज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आयपीएल २०२४साठी उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला संघात बदल करावे लागतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button