breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विराट कोहली आणि नवीन उल हक वादावर गौतम गंभीरचं मोठं विधान; म्हणाला..

Gautam Gambhir : आयपीएल २०२३च्या स्पर्धेत विराट कोहली आणि अफगाणीस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक एकमेकांना भिडले होते. त्यानंतर गौतम गंभीर आणि कोहलीमध्येही बाचाबाची झाली. या प्रकरणावर आता पहिल्यांदाच गौतम गंभीरने जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआयने या वादाबाबतचा प्रश्न गौतम गंभीरला विचारला असता तो म्हणाला, सामना सुरू असताना मैदानात काय होते, त्याच्यात पडण्याचा माझा अधिकार नाही. पण सामना संपल्यानंतरही जर कुणी माझ्या खेळाडूंबाबत बोलत असेल त्यांच्याशी वाद घालत असेल तर मला त्या वादात पडून माझ्या खेळाडूंना संरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे.

हेही वाचा  –  Big Breaking : केंद्राचे पथक दुष्काळ पाहणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार

संघाचा मेन्टॉर असल्यामुळे प्रत्येक खेळाडूचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे. जर इतर संघाचे खेळाडू माझ्या खेळाडूंशी चुकीचा व्यवहार करत असतील तर ते मी पाहू शकत नाही. सामन्यानंतरही जर वाद सुरू राहिला तर त्यात मला पडावे लागेल आणि तेच मी केले, असंही गौतम गंभीर म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button