अंतिम कसोटी सामन्यात श्रीलंकेने जिंकला टॉस
पोप इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी, धनंजया डी सिल्वा हा श्रीलंकेचे करणार नेतृत्व
लंडन : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे. धनंजया डी सिल्वा हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर ओली पोप याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन धनंजया डी सिल्वा याने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.