breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AUS Final | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अंतिम सामना, कुठे आणि किती वाजता?

U19 World Cup 2024 Final | अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. अंडर-१९ विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघ अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.

कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि सौमी पांडे या सर्वांनीच आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या या चार खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना जिंकण्याची सर्वाधिक जबाबदारी असेल. त्यामुळे भारतीय संघ सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा    –    ‘लोकसभा निवडणुकीपुर्वीच देशात CAA लागू करणार’; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा 

भारतीय संघ :

आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र पटेल, सचिन धस, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (यष्टीरक्षक), इननेश महाजन, आराध्या शुक्ला, धनुष गोवडा, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.

ऑस्ट्रेलिया संघ :

हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (यष्टीरक्षक), राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ कॉनर, कोरी वॉस्ले.

या दोन संघांमध्ये होणार अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

कधी रंगणार सामना : रविवार, ११ फेब्रुवारी २०२४

कुठे रंगणार हा सामना : विलोमूर पार्क

किती वाजता होणार ही चुरशीची लढत : भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button