क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या बातम्या

युजवेंद्र चहलनेही या चर्चांवर मौन सोडलं

मुंबई : धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर यावर धनश्री वर्माने स्टोरी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती. आता युजवेंद्र चहलनेही या चर्चांवर मौन सोडलं आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरी लिहित त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

युजवेंद्र चहलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं की, “मी माझ्या सर्व चाहत्यांचे अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे. त्यांच्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचले नसतो. पण हा प्रवास खूप दूरचा आहे!! माझ्या देशासाठी, माझ्या संघासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी अजूनही अनेक अविश्वसनीय ओव्हरर्स बाकी आहेत! मला एक खेळाडू असल्याचा अभिमान आहे, मी एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र देखील आहे.

तो पुढे म्हणाला की, तमला सोशल मीडियावरील बातम्या समजल्या, विशेषतः माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल. मी काही सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या आहेत ज्या सत्य असू शकतात किंवा नसूही शकतात. एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र या नात्याने, मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की या बातम्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप वेदना दिल्या आहेत.

माझ्या कौटुंबिक मुल्यांनी मला शॉर्टकट न स्वीकारता समर्पण आणि कठोर परिश्रमाद्वारे यश मिळविण्यासाठी नेहमी चांगले प्रयत्न करायला शिकवले आहे आणि मी या मूल्यांसाठी वचनबद्ध आहे. सहानुभूती नव्हे तर तुमचे प्रेम आणि समर्थन मिळविण्याचा मी सदैव प्रयत्न करीन, असं त्याने स्टोरी मध्ये लिहिलं आहे.

धनश्री वर्माने तिच्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या अफवांवर पोस्ट केल्यानंतर आणि 24 तासांपेक्षा कमी वेळात चहलने ही स्टोरी शेअर केली आहे. चहल आणि धनश्रीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स या जोडप्याच्या घटस्फोटाची अटकळ बांधत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button