Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

गांगुली-पीटरसनसह अंजुम चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये झाला समावेश

ICC Hall of Fame 2026 Sourav Ganguly Anjum Chopra Kevin Pietersen : आयसीसीने क्रिकेट जगतात आपल्या खेळाची आणि नेतृत्वाची खास छाप सोडणाऱ्या तीन दिग्गज खेळाडूंचा सर्वोच्च सन्मान केला आहे. भारताचा माजी आक्रमक कर्णधार सौरव गांगुली, माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा आणि इंग्लंडचा माजी स्फोटक फलंदाज केविन पीटरसन यांचा प्रतिष्ठित ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ (ICC Hall of Fame) मध्ये समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात या तिघांना क्रिकेटमधील दिग्गजांच्या यादीत स्थान देत गौरविण्यात आले. या तिघांच्या समावेशानंतर हॉल ऑफ फेममधील एकूण सदस्यांची संख्या आता १२५ वर पोहोचली आहे.

आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांनी या तिन्ही नव्या सदस्यांचे स्वागत करताना म्हटले, “क्रिकेटमधील असामान्य योगदानाबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. सौरव, अंजुम आणि केविन यांनी केवळ आपापल्या राष्ट्रीय संघांचे यशस्वी नेतृत्व केले नाही, तर जगभरातील चाहत्यांचे प्रेम मिळवले. त्यांचे हे स्थान पुढील अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील.”

या ऐतिहासिक गौरवानंतर बोलताना भारताचा ‘दादा’ सौरव गांगुली म्हणाला, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हे माझे भाग्य होते. हा कोणत्याही क्रिकेटपटूला मिळू शकणारा सर्वोच्च सन्मान आहे.”

हेही वाचा –  ‘रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुसरीकडे, माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा भावुक होत म्हणाली, “देशाची जर्सी परिधान करणे हाच माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. हा सन्मान माझ्या कारकिर्दीत योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.” तर इंग्लंडच्या केविन पीटरसनने, “दिग्गजांच्या यादीत माझे नाव जोडले जाणे हा अत्यंत नम्र करणारा क्षण आहे,” अशा शब्दांत आयसीसी आणि कुटुंबाचे आभार मानले.

आयसीसीच्या शताब्दी वर्षानिमित्त जानेवारी २००९ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. क्रिकेटच्या विकासात आणि इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंनाच हा बहुमान मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर किमान ५ वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या खेळाडूंचाच यात समावेश केला जातो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button