लिलावाआधीच विराट कोहलीचे मोठे वक्तव्य, चाहत्यांना म्हणाला…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/virat-rccb-Frame-copy.jpg)
महाईन्यूज |
आयपीएलच्या २०२० हंगामासाठी १९ डिसेंबरला कोलकात्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. मात्र या लिलावाआधीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने एक मोठे वक्तव्य केलेलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला ही मानाची स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही. त्यामुळेच यंदाच्या हंगामामध्ये विशेष तयारी करुन बेंगळुरुचा संघ मैदानात उतरणार असल्याचे संकेत कर्णधार कोहलीने दिलेले आहेत.
“आमच्या सर्व चाहत्यांनी संघाच्या पाठीशी उभे रहावे. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी मोलाचा आहे आणि जो पर्यंत आम्ही क्रिकेट खेळत राहू तो पर्यंत आम्हाला तो महत्वाचा असणार आहे. तुम्हा सर्वांचे आभार. मी यंदाच्या आयपीएल लिलावासाठी खूपच उत्सुक आहे. पाहुयात आता १९ डिसेंबरला नक्की काय होतयं,” असंही विराट या व्हिडिओमध्ये म्हणालेला आहे.
विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ हजार ४१२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट सध्या पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपरकिंग्सचा सुरेश रैना आहे. रैनाने १९३ सामन्यांमध्ये ५ हजार ३६८ धावा केलेल्या आहेत.