Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘अजित पवारांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही’; संजय राऊत

सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला

मुंबई : २०२४ ला मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज काय, मी आताही दावा सांगू शकतो. २०२४ ची कशाला वाट बघू, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं. यानंतर आता अजित पवार यांचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत पुण्यात बॅनर लावले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष लगावला आहे.

अजित पवारांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button