Breaking-newsक्रिडा
भारताला चांगल्या निवड समितीची आवश्यकता – युवराज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/yuvi.jpg)
फारुख इंजिनीयर यांच्यानंतर भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग याने सोमवारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर कडाडून टीका केली. सध्याच्या आधुनिक क्रिकेटनुसार योग्य न्याय न देता आल्यामुळे विद्यमान निवड समितीत चांगल्या सदस्यांची गरज असल्याची टीका युवराजने केली.
‘‘आम्हाला निवड सदस्यांची गरज नाही. निवड समितीचे काम खूपच कठीण आहे. निवड समितीने निवडलेल्या १५ खेळाडूंनंतर उर्वरित १५ खेळाडूंचे काय करायचे, याची चर्चा त्यांनी करायला हवी. सध्याच्या आधुनिक क्रिकेटनुसार विचार करणाऱ्या निवड सदस्यांची गरज भारताला आहे. पण विद्यमान निवड समितीची कामगिरी त्यानुसार होत नाही, असे मला वाटते,’’ असे युवराजने सांगितले.