ममता बॅनर्जी पुतनामावशी, झाशीची राणी नाही-गिरीराज सिंह

ममता बॅनर्जी यांना त्यांचा पक्ष झाशीची राणी म्हणत असेल मात्र त्या झाशीची राणी नाहीत तर पुतनामावशी आहेत अशी टीका गिरीराज सिंह यांनी केली आहे. भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी केलेल्या टीकेला आता ममता बॅनर्जी काय उत्तर देतील हे पहाणे महत्त्वाचे आहे. ममता बॅनर्जी यांना झाशीची राणी म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीला दुषणं देण्यासारखं आहे. ममता बॅनर्जी पुतनामावशी आहेत, त्या किम जाँग उनही असू शकतात पण झाशीची राणी नाही असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी या धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर भाजपाकडून बरीच टीका झाली. मात्र त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते म्हटले होते की ममता बॅनर्जी झाशीची राणी आहेत. याच वक्तव्यावर गिरीराज सिंह यांनी टीका केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जींना पुतनामावशी म्हटलं आहे.






