बॉक्सर मेरी कोमकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती : निखत झरीन

सामना जिंकल्यानंतर मेरीने हस्तांदोनल टाळले
नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
भारताची सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोम हिने सामना जिंकला. पण, खिलाडुवृत्तीने मी मेरीला अलिंगन द्यायला गेले, मात्र तीने नकार दिला. हीबाब मला योग्य वाटली नाही, अशी नाराजी प्रतिस्पर्धी बॉक्सर निखत झरीन हिने ट्टवीटरद्वारे व्यक्त केली आहे.
ऑलिम्पिक २०२० साठी पात्रता फेरीतील अंतिम लढत मेरी कोम विरुद्ध निखत झरीन अशी झाली. मेरीला कोणत्याही चाचणीशिवाय स्पर्धेत संधी देण्यात येणार होती. मात्र, याला झरीनने विरोध दर्शवला. तसेच, मेरीसोबत दोन हात करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, लढत झाली. या सामन्यात मेरीने ९-१ असा दणदणीत विजय मिळवला. परंतु, सामना संपल्यानंतर झरीन मेरीला गळाभेट घेण्यासाठी सरसावली असता, मेरीने नकार दिला. त्यामुळे आमच्यासारख्या नवोदित खेळाडुंनी सिनिअर खेळाडुंकडून काय शिकावे? असा प्रश्न झरीनने उपस्थित केला आहे.





