बंगळुरूने कर्णधार विराट कोहलीला न सांगता बदलले संघाचे नाव 🤔

क्रीडा वेब | इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळरू(आरसीबी)ने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवरुन प्रोफाइल आणि कव्हरसह सर्व फोटो काढून टाकले आहेत.
टीमने आज(गुरुवार) ट्वीट करत सांगितले की, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवरुन सर्व फोटो काढून टाकले आहेत. या गोष्टीची माहिती संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिली नाही. यासोबतच आरसीबीने आपले नावही बदलून फक्त “रॉयल चॅलेंजर्स” केले आहे. यावर कोहलीने आश्चर्य व्यक्त केले आहे.
टीमच्या या कृत्यावर लेग स्पिनर युजवेंद्र चहलनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने ट्वीट केले, “अरे आरसीबी, ही कोणती गुगली आहे? तुमची प्रोफाइल फोटो आणि इंस्टाग्राम पोस्ट कुठे गेल्या?”
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |





