क्रिडा

फिफा विश्वचषकात ‘रॉबी’चा स्वर

क्रीडाविश्वातील सर्वात भव्य अशा फिफा विश्वचषकाच्या शुभारंभ सोहळ्यात ब्रिटिश पॉप गायक रॉबी विल्यम्स त्याच्या गाण्यांवर सगळ्यांना थिरकवणार असल्याची घोषणा फिफा आणि रॉबीच्या प्रवक्‍त्यांनी केली आहे. मॉस्कोमध्ये 14 जूनला होणाऱ्या रशिया आणि सौदी अरेबिया या संघांमधील सलामीच्या सामन्यापूर्वी रंगमाऱ्या शानदार उद्‌घाटन सोहळ्यात रॉबी त्याच्या गीतांचे सादरीकरण करणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या मंचावरून सादरीकरण करायला मिळणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते आणि ते प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळणार असल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा अविस्मरणीय क्षण आहे, असे रॉबीने म्हटले आहे. दरम्यान, या सोहळ्यात ब्राझिलचा माजी आक्रमक खेळाडू रोनाल्डोदेखील सादरीकरण करणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button