Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडामहाराष्ट्रमुंबई

IND vs AUS : पहिल्या कसोटीसाठी ‘या’ खेळाडूंना भारतीय संघात संधी

सूर्यकुमार यादव आणि केएस भरतचे भारतीय कसोटी संघात पदार्पण

भारत विरूद्ध ऑस्ट्रोलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीला सुरूवात झाली आहे. चार सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जात आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
आजच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन मध्ये भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक के एस भरत यांना संघात स्थान देण्यात आले आहे. २०१७ नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने विजय मिळवला होता.

आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना किमान ३०० धावांच्या आत रोखणे गरजेचे आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघाचे २७ धावांवर २ गडी बाद झाले आहेत.

भारतीय संघ –

रोहित शर्मा(कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवीद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया संघ –

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button