Breaking-newsक्रिडा
प्रो-कबड्डी: विजेता संघ बनणार करोडपती, जाणून घ्या बक्षीसाची रक्कम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Winner.jpg)
प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाने अखेरीस आपल्या उत्तरार्धात प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या मैदानावर यंदाच्या हंगामाचे प्ले-ऑफ आणि अंतिम सामना रंगणार आहे. सातव्या हंगामासाठी प्रो-कबड्डीच्या आयोजकांनी बक्षीसाच्या रकमेची घोषणा केली आहे. या हंगामासाठी एकूण ८ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम जिंकणाऱ्या संघाला ३ कोटी तर उप-विजेत्या संघाला १.८० कोटी रुपये मिळणार आहेत. याव्यतिरीक्त तिसऱ्या-चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संघांनाही रोख रकमेचं बक्षीस मिळणार आहे. दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, यू मुम्बा, हरयाणा स्टिलर्स, बंगळुरु बुल्स आणि यूपी योद्धा या संघांनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.
अशी असेल बक्षीसाची रक्कम –
- विजेता संघ – ३ कोटी
- उप-विजेता संघ – १.८० कोटी
- तिसरा क्रमांक – ९० लाख
- चौथा क्रमांक – ९० लाख
- पाचवा क्रमांक – ४५ लाख
- सहावा क्रमांक – ४५ लाख