Breaking-newsक्रिडा
पुणे संघाला विजेतेपदाचा मान

- विभागीय टेबल टेनिस स्पर्धा
पुणे– येथे सुरु असलेल्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाचा 3-1 अश्या फरकाने पराभव करताना पुणे संघाने विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
विभागीय टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतीम सामन्यात पुणेच्या आर्यन पानसे, अर्नव दत्ता आणि साहिल सळुजायांनी चमकदार कामगिरी करताना पिंपरी चिंचवडच्या निनाद भोर, श्लोक घापरा, समययांचा पराभव करताना स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान मिळवला. अंतिम फेरीतील पहिल्या सामन्यात आर्यन पानसेने समयचा 3-0 असा पराभव केला तर साहिल सळुजाचा निनाद भोरने 3-0 असा पराभव करत पिंपरीच्या संघाला सामन्यात पुनरागमन करवले. त्यानंतर अर्नर दत्ता आणि आर्यन पानसेयांनी श्लोक धापरा आणि निनाद भोरचा पराभव करताना विजेतेपद पुण्याच्या संघाला मिळवून दिले.





