Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

नवीन वर्षात जसप्रीत बुमराहला मिळाली आनंदाची बातमी, मानाच्या पुरस्काराने सन्मान

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला गेला आहे. २०१८-१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी जसप्रीतची बीसीसीआयच्या मानाच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून बुमराहचा सन्मान देखील होणार आहे.

२०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या जसप्रीतने आपल्या तेजतर्रार माऱ्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं आहे. जसप्रीतने केवळ १२ कसोटी सामन्यांत ६२ बळी मिळवत फार कमी कालावधीत संघातलं आपलं स्थान पक्कं केलं. याचसोबत अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात बुमराहची भूमिका महत्वाची होती. त्याच्या याच कामगिरीचा आता बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button