Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार! महाराष्ट्रातून नव्या चेहऱ्यांना संधी

नवी दिल्ली : पुढील काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. या फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार, कोणाला डच्चू मिळणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही नव्या चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून एकूण ६ मंत्री आहेत. यामध्ये २ कॅबिनेट मंत्री तर ४ राज्यमंत्री आहेत. पक्षीय पातळीवर बघितले तर भाजपचे ४ मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे आणि रिपाईचे प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या ८ होऊ शकते. यामध्ये त्या त्या पक्षांच्या विद्यमान मंत्री संख्येव्यतिरिक्त शिंदेंच्या शिवसेनेकडे १ अतिरिक्त मंत्रीपद आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे १ अतिरिक्त मंत्रीपद दिले जाऊ शकते.

भाजपच्या कोट्यातून मंत्री असलेल्या कोणत्याही चेहऱ्याला डावलण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते. राज्यमंत्री पदाबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास राज्यसभा खासदार माया इवनाते किंवा अनिल बोंडे यांना संधी दिली जाऊ शकते. तसे करायचे झाल्यास पक्षाला कोणत्याही एका राज्यमंत्र्याला डच्चू द्यावा लागेल. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला एक अतिरिक्त मंत्री पद मिळणार आहे. एकूण २ मंत्रीपदांपैकी पक्षाचे संसदीय नेते श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकते तर नव्या आलेल्या खासदारांच्या गटापैकी संजय जाधव किंवा ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी एकाला राज्यमंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते. याचा सर्वस्वी निर्णय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे येथील. श्रीकांत शिंदे यांनाच कॅबिनेट मंत्री करावे का, याबाबतही एकनाथ शिंदेंचा निर्णय अंतिम असेल.

हेही वाचा –  “ड्रग नेटवर्कविरुद्ध कठोर कारवाई होणार”; केंद्रिय गृहमंत्री अमित शहा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संसदेतील सदस्य संख्या पाहता यापूर्वी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देऊ केले होते. मात्र त्यांच्याकडून मंत्रिपदासाठी प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित होते आणि प्रफुल पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्री पद भूषवले होते. त्यामुळे त्यांनी राज्यमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला होता. आता दोन्ही सभागृह मिळून अजित पवार गटाच्या खासदारांची संख्या ५ झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला १ कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यास त्यामध्ये प्रफुल पटेल यांच्या नावाची वर्णी लागू शकते.

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळातील ६ विद्यमान मंत्री

१) नितीन गडकरी

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री

मतदारसंघ: नागपूर

२) पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री

मतदारसंघ: मुंबई उत्तर

३) प्रतापराव जाधव

आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री

मतदारसंघ: बुलढाणा

४) रामदास आठवले

सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री

मतदारसंघ: राज्यसभा (महाराष्ट्र)

५) रक्षा खडसे

युवक व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री

मतदारसंघ: रावेर

६) मुरलीधर मोहोळ

सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

मतदारसंघ: पुणे, महाराष्ट्र

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button